रत्नागिरी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांच्या दालनात अपंग बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासंदर्भात पार पडली बैठक
शिवसेना सचिव रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांच्या दालनात अपंग बांधवांच्या अडचणी संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला समाजकल्याण सभापती परशुराम कदम, जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.एन.बी.घाणेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.यादव, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील अधिकारी प्रतिनिधी श्री.जाधव, समाजकल्याण अधिकारी श्री.चिकने,आस्था फाऊंडेशनच्या सुरेखा पाथरे, आर.एच.पी.फाऊंडेशनच्या नाकाडे, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे रसाळ व कांबळे आदी उपस्थित होते. मागील समाजकल्याण समितीच्या बैठकीत अपंगांना येणाऱ्या अडचणी संदर्भात बरीच चर्चा करण्यात आल्या नुसार या सभेची बैठक आयोजन करण्यात आली..सदरच्या बैठकीत घरकुल योजनेत अपंग बांधवांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळाला पाहिजे, अंत्योदय योजनेत अपंग बांधवांना कसा न्याय मिळेल, रेशन कार्ड येकत्र असेल तरी स्वतंत्र ३५ किलो धान्य अपंगांना कसे देता येईल, अपंगांच्या ऑनलाईन प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अडी अडचणी, अशा स्वरुपातील मागिल अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील सर्व अपंग बांधवांच्या नोंदी अॅप द्वारे करण्यात याव्यात व त्यानुसार टक्केवारीच्या नोंदी समाविष्ट करण्याचे ठरविले म्हणजे जिल्ह्यातील 40टक्के खाली आलेले अपंगांच्या सर्टफिकेट मधील अडचणी तालुकानिहाय सोडवताना सोयीचे ठरेल. दिव्यांग सेस ५ टक्के योजनेतून अपंग बांधवांना प्रमाणपत्रासाठी सतत ये-जा करावी लागते त्याचा खर्च देण्याचे नियोजन 5 टक्के दिव्यांग सेस निधीतून करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे परशुराम कदम यांनी सांगितले. अंत्योदय योजनेत अपंगांना धान्य मिळण्याबाबत जिल्ह्यातील सर्व तहसीलदार ऑफिस ला या आजच्या सभेनुसर सर्वत्र कळवले जाईल असे पुरवठा अधिकारी प्रतिनिधी यांनी सांगितले.त्यानंतर सभापती कदम यांनी अपंगांच्या केंद्रातील घरकुल योजनाच्या अडचणी खासदार साहेब यांच्याकडे परिपूर्ण माहिती घेऊन जाऊया आणि अंत्योदय योजनेतील त्रुटी उच्च तंत्र शिक्षण मंत्री सामंत साहेब यांच्या कडे आपण सर्व मांडूया असे ठरले.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा