खेड तालुक्यातील गणेशनगर भरणे येथे रत्नागिरी जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता चंद्रकांत गमरे यांनी ठेकेदार तक्रारदार यांच्या प्रलंबित कामापैकी काही काम झाल्यानंतर त्या कामाचे मुल्यांकन करुन बिल मंजूरी करिता वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून मागणी केलेल्या रक्कमेपैकी ५० हजार रुपये लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारल्यानंतर त्यांना दिनांक २२ नोव्हेंबर रोजी रंगहात पकडण्यात आले आहे. यातील तक्रारदार हे नोंदणीकृत ठेकेदार असून त्यांना मंडणगड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १४ उपकेंद्रांची दुरुस्ती व अद्ययावतीकरण करण्यासाठी ई निविदा भरलेली होती. त्या अनुषंगाने निविदा रक्कम ५०,०६,४९१ रुपये प्रमाणे काम करण्याचे कार्यारंभ आदेश मिळाले होते. सदर कामाची देखरेख व कामाचे मुल्यांकन करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद यांच्यामार्फत कनिष्ठ अभियंता लोकसेवक गमरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तक्रारदार यांनी अद्यापपर्यंत पूर्ण केलेल्या कामाचे मुल्यांकन करुन बिलाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यासाठी लोकसेवक गमरे यांनी तक्रारदार यांनी केलेल्या कामाच्या रक्कमेच्या २ टक्के प्रमाणे ६० हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली. म्हणून तक्रारदार यांनी लोकसेवक चंद्रकांत गमरे यांच्याविरुद्ध अँटी करप्शन ब्युरो रत्नागिरी येथे दिनांक २४/०९/२०२१ रोजी लाचेच्या मागणीची तक्रार दिलेली आहे. सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक २४/०९/२०२१ रोजी केलेल्या पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक चंद्रकांत गमरे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यान्नी केलेल्या कामाचे मुल्यांकन वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यासाठी केलेल्या कामाच्या रक्कमेच्या २ टक्के प्रमाणे ६० हजार ते ७० हजार रुपये प्रमाणे लाचेची मागणी केल्याचे व ती स्वीकारल्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. म्हणून अँटी करप्शन ब्युरो रत्नागिरीने ही कारवाई केली आहे. सदरची सापळा कारवाई पोलिस उपअधिक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक प्रविण ताटे, सहाय्यक पोलिस फौजदार संदीप ओगले, पोलिस हवालदार संतोष कोळेकर, विशाल नलावडे, पोलिस नाईक योगेश हुंबरे, पोलिस शिपाई हेमंत पवार, राजेश गावकर यांनी केली आहे.
Free Reporter Training

Certified & full Corse Residential & Onlin e
-
Blogger Comment
-
Facebook Comment
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा