🔴 *रत्नागिरी - कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबा घाटातून आजपासून एसटी बस सेवा व सहाचाकी वाहतूक सुरु - खासदार विनायक राऊत*
➡️ रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.१६६ वरील साखरपा ते आंबा या घाट भागात मुसळधार पावसामुळे बारा ठिकाणी दरड कोसळून महामार्ग पुर्णपणे बंद झाला होता. दरड कोसलेल्या भागातील माती हटवून पाच दिवसात हलक्या वाहनांची वाहतुक सुरु केली होती. परंतु अवजड वाहतुक बंद असल्यामुळे प्रवासी वर्ग, अवजड वाहतूकदार, कोकणातील शेतकरी, लाकूड व्यापारी, चिरे खाण व्यावसायिक यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यामुळे इंधन, वेळ, पैसा याचा मोठा अपव्यय होत होता. *रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री विनायकजी राऊत* हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असता व्यापाऱ्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. तेव्हा शिवसेना सचिव, शिवसेना लोकसभा गटनेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत ह्यांनी अधिकारी व लोकप्रतिनिधी ह्यांच्या सह संयुक्त पाहणी दौरा केला त्यानुसार आंबा घाट लवकर चालू करण्याच्या अनुषंगाने त्यावेळी रत्नागिरी व कोल्हापूर दोन्ही जिल्ह्याची संयुक्त बैठक कोल्हापूर पालकमंत्री यांना आयोजित करण्यास सांगितले. परंतु काही कारणास्तव ती बैठक झाली नाही. म्हणून खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री यांना पत्रव्यवहार करुन जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यास सांगितले.
त्यानुसार २९/१०/२०२१ रोजी सकाळी ०९.३० वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे *महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री मा. ना अनिलजी परब व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री मा. ना उदयजी सामंत व शिवसेना सचिव, शिवसेना लोकसभा गटनेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत* ह्यांच्या समवेत आंबा घाटाचे चालू असलेल्या कामाचा आढावा घेऊन घाटातून सहा चाकी वाहनाचे मालासह एकूण वजन जास्तीत जास्त २० टन किंवा त्यापेक्षा कमी असावे अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार आज राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी परिपत्रक काढून सहाचाकी वाहतूक व एसटी सेवा पूर्ववत चालू करण्यात आली आहे.
https://chat.whatsapp.com/IIdr1gEmXvF7ErF1ZrmHpK
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा