एस. टी.आंदोलन चालू आहे. तरी शिवसेनेच्या काही नेत्यांनी अट्टाहासाने एस.टी.चालू करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रमुख मागणीसाठी संपूर्ण राज्यात एस.टी.सेवा बंद आहे. हे आंदोलन सोडावे मोडावे म्हणून काही प्रमुख मंडळी प्रयत्न करत आहेत. हा डाव मनसेने हाणून पाडला. राजापूर ते रत्नागिरी अशी मंगळवारी एस.टी. सोडण्यात आली व ते काही मनसैनिकांना समजल्यावर मनसे पधादिकारी व कार्यकर्ते यांनी राजापुर वरून आलेली एस.टी. बस मारुती मंदिर सर्कल वरून राजापूर दिशेला पुन्हा पाठवली.
मनसे उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत, मनसे कामगार सेना जिल्हाचिटणीस छोटू खामकर, शहराध्यक्ष सतीश राणे, उपशहराध्यक्ष मयुरेश मडके, अमोल श्रीनाथ, सर्वेश जाधव, अक्षय माईन, राहुल खेडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बस मधील चालक व वाहक यांना पुष्पगुच्छ देऊन ती बस मारुती मंदिर सर्कल वरून राजापूर एस. टी. आगारात पुन्हा पाठवली.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा