उद्या दिनांक २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आकाशवाणी केंद्र रत्नागिरी वरून माझ्या निवडक ८ कवितांचे प्रसारण होत आहे. मी स्वतः माझ्या काही कविता सादर करणार आहे. त्यामागचे विचार, जाणिवा, त्यामागची कवी म्हणून भूमिका आणि इतर अनेक गोष्टी आपण ऐकू शकाल.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता.
https://www.radioindialive.com/air-ratnagiri-live-all-india-radio
माझे हितचिंतक, मित्र मैत्रिण, मृदगंधाचे नियमित वाचक, आणि माझे मार्गदर्शन केवळ या सर्व्यांच्या प्रेम, विश्वास आणि सोबतीमुळेच इथवरचा प्रवास शक्य झाला आहे. तुम्हा सर्वांची मी खरोखर ऋणी आहे.
*'काही स्वप्नांचं असंच असतं'* या माझ्या काव्यसंग्रहाची निवड करून माझ्या विचारांना व्यक्त होण्याची सुवर्णसंधी दिली हा मी माझ्या कवितेचा बहुमान समजते. हा एक अनोखा अनुभव माझ्या वाट्याला येवू शकला त्याबद्दल *रत्नागिरी आकाशवाणी केंद्राचे अगदी मनापासून धन्यवाद..* 😊🙏
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा