रत्नागिरीला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाला मिळणार बळकटी
दै फ्रेश न्यूज (वृत्तसंस्था)- रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी पानवल धरणाच्या बळकटीचा ठराव मंजूर करून घेत दुरुस्तीचे अंदाजपत्रक बनवण्याबाबत पाणी विभागाला सूचना केल्या. त्यानुसार पाणी विभागाचे अभियंता अविनाश भोईर यांनी प्रस्ताव बनवून तो रत्नागिरी नगर परिषदेला देण्याची विनंती पाटबंधारे विभागाने केली आहे.
पानवल धरणाच्या बळकटीकरणासाठी पाटबंधारे विभागाला अंदाजपत्रक बनवण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. या कामासाठी 12 ते 13 कोटी रूपये खर्च अपेक्षित धरला जात असून रत्नागिरी नगर परिषदेची आर्थिक क्षमता नसल्याने हा निधी शासनाकडून मिळावा, म्हणून प्रयत्न केला जाणार असल्याचे नगराध्यक्ष साळवी यांनी सांगितले.
पानवल धरणातील पाणीसाठा ठिकठिकाणच्या गळतीमुळे फेब्रुवारी महिन्यातच संपतो. त्यामुळे या धरणातील पाणी ज्या भागाला मिळते, तेथे
पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून एमआयडीसीकडून पाणी विकत घ्यावे लागते. त्यासाठी नगर परिषद महिन्याला लाखो रुपये या पाण्याच्या बिलासाठी खर्च करते. धरणाचे बळकटीकरण झाल्यानंतर ज्या परिसराला फेब्रुवारीनंतर पाणीटंचाई भासते तेथे पावसाळ्यापर्यंत पाणी मिळू शकते.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा