पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशनची दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यकारीणी जाहीर
जिल्हाध्यक्षपदी दुर्गेश आखाडे यांची निवड
सिध्देश मराठे, राहूल वर्दे, गोकुळ कांबळे यांची तालुकाध्यक्षपदी निवड
रत्नागिरी, दि. १८. प्रतिनिधी : द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशनच्या दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी दुर्गेश आखाडे, उपाध्यक्षपदी नंदकुमार सुर्वे, जिल्हा सचिवपदी प्राजक्ता किणे,रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी सिध्देश मराठे, लांजा तालुकाध्यक्षपदी राहूल वर्दे आणि राजापूर तालुकाध्यक्षपदी गोकुळ कांबळे यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशनची बैठक आज रत्नागिरीत पार पडली. या बैठकीला प्रदेश कार्याध्यक्ष सतीश कदम, कोकण अध्यक्ष इकलाख खान, कोकण उपाध्यक्ष दीपक शिंदे, उपाध्यक्ष निसार शेख, कोकण सहसचिव सुरेश पवार उपस्थित होते. यावेळी दक्षिण जिल्हा कार्यकारीणीची निवड करण्यात आली. रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी दैनिक सामनाचे पत्रकार दुर्गेश आखाडे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी प्रेस फोटोग्राफर नंदकुमार सुर्वे,जिल्हा सचिवपदी प्राजक्ता किणे यांची निवड करण्यात आली. रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी फ्रेश न्युजचे सिध्देश मराठे, लांजा तालुकाध्यक्षपदी माझे कोकणचे प्रतिनिधी राहूल वर्दे, लांजा तालुकाध्यक्ष पदी माझे कोकणचे गोकुळ कांबळे, रत्नागिरी तालुका उपाध्यक्षपदी माझे कोकणचे सचिन सावंत, रत्नागिरी तालुका सचिव पदी फ्रेश न्यूजच्या पूर्वा किणे, सहसचिवपदी साप्ताहीक कोकण स्टारचे रवींद्र साळवी, रत्नागिरी तालुका खजिनदार पदी दखल न्युजचे निलेश आखाडे आणि संघटनेच्या कोकण कार्यकारीणीवर प्रेस फोटोग्राफर अजय बाष्टे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष सतिश कदम यांनी गेली साडेतीन वर्षे ही संघटना राज्यस्तरावर काम करत आहे. कोकणातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आपण या संघटनेसोबत आलो असून पत्रकारांच्या हिताचे उपक्रम राबवले जातील असे सांगितले. कोकण अध्यक्ष इकलाख खान यांनी संघटनेची माहिती देताना कार्यकारीणीचे स्वरुप आणि कार्यपध्दतीबाबत माहिती दिली.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा