खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्ह्याच्या ३ऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने...!
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचा आज २०नोव्हेंबर तिसरा वर्धापनदिन. पाहता-पाहता सर्वांच्या नजरेसमोर ही विश्वासार्हवाटचाल ३ वर्षांची झाली.पतसंस्था जगतात (रत्नागिरी जिल्ह्यात)सर्वमान्य नाव म्हणून आज 'खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचे' घेतले जाते.
सन २०१९- २० व २०२०-२०२१ ही दोन आर्थिक वर्षे कोव्हीड-१९या महामारीने ने ग्रासलेली आर्थिक वर्षे होती. दिर्घकालीन लॉकडाऊनमुळे क्षतीग्रस्त व्यवसाय जगत, ठप्प झालेले जनजीवन या सर्वांमध्येही
अर्थकारणाची गती राखण्याचं आव्हान आमच्या खारवी सामाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने पेलले. आर्थिक शिस्त,विश्वासार्हता, ग्राहक सेवा या गोष्टी जपत "खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने" आपला आर्थिक व्यवहार वर्धिष्णू केला आहे.
३ वर्षात ३८९५ ग्राहक सभासदांच्या जवळ दृढ केलेले भावबंध, ०५ कोटी २१ लाखाच्या ठेवी, ०४ कोटी ०९ लाखाची कर्जे, ०१कोटी ३८ लाखाची गुंतवणूक,६ कोटी ३९ लाखांचे खेळते भांडवल , सलग ३ वर्षे अ वर्ग प्राप्त, आदर्श प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात नफा असणारी संस्था * *१ प्रधान कार्यालय व १ सेवाकेंद्राच्या माध्यमातून झालेला कार्यविस्तार आणि या विस्ताराच्या अर्थचक्राला उत्तम सेवा देऊन गतिमान करणारे सन्मा. संचालक मंडळ ५ जणांचा कर्मचारी वर्ग व त्यात नव्यानेच सहकार्याची जोड लाभली ती १३ जणांच्या जिल्हा समनव्य समिती सदस्यांची.
३ वर्षात झालेले हे मार्गक्रमण संपूर्ण जिल्ह्याला गवसणी घालते झाले.अत्यल्प थकबाकी, विक्रमी वसुली करणारी पतसंस्था म्हणून नावाजलेली ही संस्था. आपल्या अर्थकारणात व्यावसायिकता आणि सहकारतत्त्व यांची सांगड घालून विस्तारत आहे.सहकारातील सामुहिक ताकद निर्माण करताना नवतंत्रज्ञान, व्यवसाय -संधी याचा कायद्याच्या परिघात राहत अचूक लाभ उठवत ग्राहकांनाही या लाभात सहभागी करून घेणारी खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था
सहकारातला हा प्रवास खूप अनुभव देणारा ठरत आहे. सहकारात रचनात्मक काम करणाऱ्या अनेक मोठ्या व्यक्तिमत्वांजवळ संपर्क होत आहे व मार्गदर्शन लाभत आहे. अनुभवाची समृद्ध शिदोरी या प्रवासामुळे प्राप्त झाली. अध्यक्ष म्हणून काम करताना कर्तव्याला प्राधान्य देत नवनवीन धोरण ठरवत, निर्णय घेत त्याचे क्रियान्वयन करण्यासाठी आग्रही राहण्याचे कर्तव्य बजावताना खूप समाधान प्राप्त होते. "खारवी समाज विकास नागरी सहकारी* पतसंस्थेच्या" या आर्थिक विश्वात...जपत-वाढवत आहोत ती विश्वासार्हता आणि विश्वासार्हतेच्या मजबूत पायावर आता सातत्याने उंचउंच वाढणारी "खारवी समाज विकास पतसंस्था" आपल्याला पाहायला अनुभवायला मिळते आहे.
३ वर्षांचा हा प्रवास समृद्धतेचा आहे. लक्ष्मी देवता, श्रमदेवता आणि सरस्वती देवता या त्रयींचा आशीर्वाद लाभलेली व व्रतस्थ भूमिकेतून काम करणारी आपली संस्था. आपल्या सर्वांच्या सदिच्छा, सहकार्य अविरत बहरत राहो, हा अर्थविस्तार अखंड अग्रेसर होत राहो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!
३ ऱ्या खारवी समाज विकास पतसंस्था वर्धापनदिनी सर्व सन्मा. संचालक मंडळ सदस्य, समनव्य समिती सदस्य,प्रशासन वर्ग, सभासद, कर्जदार ,ठेवीदार, पिग्मी खातेदार, हितचिंतक सर्वाना कृतज्ञता पूर्वक धन्यवाद!
आपला,
संतोष पावरी
(अध्यक्ष)
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,रत्नागिरी जिल्हा
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा