Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

ब्रेकिंग न्युज : एसटी कर्मचाऱ्यांत फूट;अजय गुजर प्रणित संघटनेचीसंप मागे घेतल्याची घोषणा

मुंबई :
राज्यात मागील 54 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनात आता उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी एसटी संपातून माघार घेतली आहे.
आज परिवहन मंत्री अनिल परब आणि अजयकुमार गुजर यांच्यात प्रदिर्घ चर्चा झाली. त्यानंतर अजयकुमार गुजर यांनी आपण संप मागे घेतल्याचं जाहीर केलं. 'आम्ही संप पुकारला होता. तो आज झालेल्या बैठकीनंतर आम्ही मागे घेत आहोत. एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाचा लढा न्यायालयावर सोपवलेला आहे. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की, सर्व कर्मचाऱ्यांनी आपण पुकारलेला लढा चर्चा
केल्याप्रमाणे आता थांबवत आहोत. 22 डिसेंबरपर्यंत तुम्ही कामावर हजर व्हा. आपल्यावरील कारवाई मागे घेण्याची विनंती आम्ही केली आहे', असं अजय गुजर यांनी सांगितलं. दरम्यान, अजय गुजर यांची
ही घोषणा महत्वाची आहे. कारण, अजय गुजर प्रणित महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेनं ही संपाची नोटीस दिली होती. दरम्यान, आझाद मैदान आणि राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. याबाबत विचारलं असता, कर्मचारी भावनावश होत आहेत. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे ही भूमिका आम्ही घेतली आहे. आम्ही कुणाकडून पैसे घेतले नाहीत, पैसे कुणी जमा केले हे आम्हाला माहिती नाही.
आमच्यामध्ये आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यात कोणतीही फूट पडलेली नाही, असं अजय गुजर यांनी सांगितलं. तसंच आता चर्चा  करायची नाही. आम्ही संप पुकारला होता तो आम्ही मागे घेतला आहे,
असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा