प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत फेज ३ साठी ५ किमी अंतराची असलेली अट शिथिल करा - खासदार विनायक राऊत
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते शिवसेना सचिव मा श्री विनायकजी राऊत यांनी आज प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत फेज ३ साठी ५ किमी अंतराची असलेली अट शिथिल करून नॉर्थ ईस्ट प्रमाणे पश्चिम घाट क्षेत्रातील लोकांसाठी २५० लोकसंख्येच्या तुलनेत रस्ते बनविण्यात यावेत जेणेकरून डोंगराळ प्रदेशातील लोकांना, विद्यार्थ्यांना, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल इ. अत्यावश्यक ठिकाणी जाणे सोईचे होईल अशी विनंती ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री मा.ना.श्री. गिरीराज सिंग यांच्याकडे करून....कोकणच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा