Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रत्नागिरी शहरातील मध्यवस्तीत होत होती गांजा विक्री...!

रत्नागिरी:
शहरातील खडपेवठार येथे गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणार्‍या तरुणाला शहर पोलिसांनी अटक केली.त्याच्याकडून 6 हजार रुपयांचा गांजा आणि 30 हजारांची दुचाकि असा एकूण 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई मंगळवार 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वा.करण्यात आली.
मोहम्मद ताहिर इब्राहिम मस्तान (32,रा.वरचा मोहल्‍ला मिरकरवाडा,रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात पोलिस नाईक राहुल घोरपडे यांनी फिर्याद दिली आहे.त्यानूसार,मंगळवारी सायंकाळी मोहम्मद मस्तान हा खडपेवठार येथील सतीचे मंदिराजवळ आपल्याजवळ गांजा बाळगून त्याची विक्री करत होता.पोलिसांनी त्याची चौकशी करुन तपासणी केली असता त्याच्याकडे 6 हजार रुपयांचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला.
बुधवारी मस्तानला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत केली.





२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
-----------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8999088923


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा