रत्नागिरीतील ओरी ग्रामसेविका यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, सरपंचांचे मुख्य कार्यकारी अधिका-यांना पत्र
दिनांक २९ / ११ / २०२१ रोजी रत्नागिरी ओरी ग्रामपंचायतीची महिलासभा सकाळी १०.०० वा., बजेट ग्रामसभा सकाळी १०.३० वा., विशेष तहकुब ग्रामसभा दुपारी १२.०० वाजता आयोजित करण्याबाबत दिनांक -२० / ११ / २०२१ रोजी सरपंच, ग्रामसेविका यांच्या संयुक्त स्वाक्षरीने सदर ग्रामसभेचा अजेंडा काढण्यात आला होता. सदर २९ / ११ / २०२१ रोजी होणारी ग्रामसभा १०६ ग्रामस्थांच्या उपस्थितीत ( कोरम पूर्ण झाल्याने ) घेण्यात येणार होती. सदरची ग्रामसभा बजेट ग्रामसभा असल्याने ग्रामपंचायत सचिव या नात्याने ग्रामसेविका सौ.जान्हवी लिंगाप्पा शिंगाई यांनी या सभेला उपस्थित राहणे क्रमप्राप्त होते. परंतु ग्रामसेविका सौ.जान्हवी लिंगाप्पा शिंगाई यांनी २९ / ११ / २०२१ ला सकाळी १०.०० वा . ग्रामसभा ठरलेली असताना सकाळी ८.१५ वाजता सरपंच यांना तब्येतीचे कारण सांगुन मी सभेला येवू शकत नसल्याचे सांगितले तसेच या ग्रामसभेला तुम्ही तरवळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री . पी . व्ही . घडशी यांना बोलावून सदर ग्रामसभा चालवा असे बेजबाबदार वक्तव्य केले. परिणामी वैयक्तीक कामे बाजुला ठेवून सदर ग्रामसभेला उपस्थित राहिलेल्या १०६ ग्रामस्थांनी बेजबाबदार तसेच कोणतेही गांभिर्य नसलेल्या ग्रामसेविका सौ.जान्हवी लिंगाप्पा शिंगाई यांच्यावर ग्रामपंचायतीने वरिष्ठ कार्यालयासोबत पत्रव्यवहार करुन शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच दिनांक -२९ / ११ / २०२१ ची ग्रामसभा ग्रामसेविका नसल्याने स्थगित करुन ग्रामसेविका यांच्यावर वरिष्ठ कार्यालय जोपर्यंत शिस्तभंगाची कारवाई करत नाहीत तो पर्यंत सदरची ग्रामसभा घेण्यात येवू नये असे सूचित केले आहे. तरी सदर १०६ ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामसेविका सौ. जान्हवी लिंगाप्पा शिंगाई यांच्यावर बेजबाबदार वक्तव्य तसेच कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे पत्र ओरि ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा