Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

आंबा घाट रस्ता दुरुस्ती न झाल्यास बुधवार दि १२ जानेवारीस रस्ता रोको!शेतकरी-कष्टकरी संघटनेच्या अशोकराव जाधवांची घोषणा !

(प्रसिध्दीसाठी) 
आंबा घाट रस्ता दुरुस्ती न झाल्यास बुधवार दि १२ जानेवारीस रस्ता रोको!शेतकरी-कष्टकरी संघटनेच्या अशोकराव जाधवांची घोषणा !
देवरुख -चिपळूण मधील कुंभालीं घाट दुरुस्ती यशस्वी अंदोलना नंतर आता संगमेश्वर मधील आंबा घाटातील साखरपा, मुर्शी ते दःख्यन रस्त्यातील जिवघेणे खड्डे न भरल्यास १२ जानेवारी रोजी शेतकरी -कष्टकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन रत्नागिरी _ नागपूर नॅशनल हायवे वरील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा , मुर्शी , दःखन गावातून आंबा घाटातील सुमारे चार कि.मी मधील जिवघेणे खड्डे बुधवार दिनांक १२ जानेवारी पर्यंत किंवा त्यापुर्वी भरण्याचे काम चालू न केल्यास राजमाता जिजाऊ दिना निमित्त काँग्रेसचे जेष्ठ नेते रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे ऊपाध्यक्ष, प्रवक्ते आणि संस्थापक अध्यक्ष शेतकरी -कष्टकरी संघटनेचे नेते अशोकराव जाधव यांचे नेतृत्वा खाली रस्ता रोको अंदोलन करणार असलेचे शेतकरी . कष्टकरी संघटनेच्या प्रसिध्दी पत्रकात विश्वनाथ किल्लेदार यांनी म्हटले आहे . या बाबत शासनाने जनतेच्या सहन शिलतेचा अंत पाहू नये कारण लोकप्रती निधी पूर्णपणे असफल झालेचे या बाबत स्पष्ट झाले आहेत म्हणून शेतकरी _कष्टकरी संघटनेला आणि काँग्रेसला पुढाकार घ्यावा लागत असलेची प्रतिक्रिया अशोकराव जाधव यांनी दिली . रस्ता रोको आंदोलन आणि प्रशासनाला जाग आणने साठी आबाजी सावंत , राजेश पत्यानी , बापू चव्हाण (ऊर्फ )लोटणकर , काका शेटये , दादा गांधी , सुरेश शिंदे , दळवी , अनिल कांबळे , भाई बेर्डे, पत्की , जायगडे , शेवाळे , कोलते, शिंदे तसेच वाहतूक संघटना , रिक्षा संघटना या सर्वांना सामिल करून जागृती केली जाणार असलचे अशोकराव जाधव यांनी सांगितले .


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा