Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी तालुक्यातील इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती पूर्वतयारीसाठी एक हजार विद्यार्थ्यांसाठी चार हजार प्रश्नपत्रिका पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण मोफत तयारी करून घेण्यात येणार

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हातभार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांचतर्फे प्राथमिक स्वरूपात रत्नागिरी तालुक्यातील इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती पूर्वतयारीसाठी एक हजार विद्यार्थी यांच्यासाठी चार हजार प्रश्नपत्रिका पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण मोफत तयारी करून घेण्यात येणार आहे. यासाठी प्रश्नपत्रिकेतील इंग्लिश व बुद्धिमत्ता या प्रश्नपत्रिकेचे उद्घाटन मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त करण्यात आले.
भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थीच रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय सेवेच्या उच्चस्तरीय स्पर्धा परीक्षाना कमी पडता कामा नये यासाठीचा छोटासा प्रयत्न अशी संकल्पना हातभार फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष परशुराम कदम यांची आहे.
इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती सराव प्रश्न पत्रिका अनावरण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होताना उपस्थित समाजकल्याण सभापती तथा हातभार फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष परशुराम कदम, जि.प.सदस्य तथा उपजिल्हा प्रमुख महेश म्हाप, मयुरेश कदम, मनोजकुमार खानविलकर, मेस्त्री सर आदी उपस्थित होते.
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा