मध्य रेल्वेवर ठाणे व दिवा जंक्शन विभागादरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गावरील देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे २३ जानेवारीला धावणारी सीएसएमटी मुंबई - करमाळी तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. याशिवाय यादिवशी कोकण रेल्वेच्या काही गाड्या पनवेल येथूनच सुटणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ठाणे व दिवा जंक्शन विभागादरम्यान हाती घेण्यात येणाऱ्या कामांमुळे तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. याशिवाय ४ गाड्यांवरही याचा परिणाम होणार आहे. नेत्रावती एक्स्प्रेस , जनशताब्दी एक्स्प्रेस , कोकणकन्या एक्स्प्रेस , मांडवी एक्स्प्रेस या गाड्या २२ जानेवारी रोजी पनवेलपर्यंतच धावतील व दुसऱ्या दिवशी या गाड्या पनवेल येथूनच सुटणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा