बॅक्टेरिया अॅसिड तयार करतात, ज्यामुळे दातांमध्ये पोकळी (cavity) निर्माण होऊ शकते. सामान्यतः याचे मुख्य कारण स्ट्रेप्टोकोकस म्यूटन्स नावाच्या जीवाणूला मानले जाते. दातांना कीड लागण्याच्या पहिल्या टप्प्यात दातांमधून खनिजे कमी होऊ लागतात, जे पांढ-या डागांच्या रूपात दिसू लागतं. जेव्हा दातांच्या इनेमलला म्हणजेच वरील आवरणाला नुकसान पोहचते तेव्हा असे होते.
ऑइल पुलिंग (home remedies)
ऑइल पुलिंग ही एक आयुर्वेदिक पद्धत आहे ज्याद्वारे दात स्वच्छ आणि मजबूत होण्यास मदत होते. यामध्ये एक मोठा चमचा तीळ किंवा खोबरेल तेल तोंडात घेऊन सुमारे 20 मिनिटे जोरजोरात घुसळायचं आणि नंतर थुंकायचं. एका संशोधनात असे सूचित केले गेले की ते दातांचे आरोग्य सुधारू शकते. यामुळे तोंडातील बॅक्टेरिया, प्लेक आणि हिरड्यांची सूज कमी होते.
कोरफड
एलोव्हेरा टूथ जेल कॅव्हिटी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करू शकते. या जेलचा अँटीबॅक्टेरियल प्रभाव तोंडात वाढणा-या बॅक्टेरियाला रोखण्यात प्रभावी भूमिका निभावतो. कोरफडीचा वापर टी ट्री ऑइल सोबत कॅव्हिटी जंतुनाशक म्हणून केला जातो.
ज्येष्ठमधाच्या मुळ्या खा
ज्येष्ठमधाच्या काड्यांमध्ये किंवा मुळ्यांमध्ये अँटीबॅक्टीरियल गुणधर्म असतात जे तोंडातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतात. 2019 च्या अभ्यासात असे आढळून आले की त्याच्या रसामध्ये अँटीबॅक्टीरियल गुणधर्म असतात जे फ्लोराइड माउथवॉशपेक्षा अधिक शक्तिशाली असतात.
गोड पदार्थ खाऊ नका
जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने दातांमध्ये जंत होण्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. साखर तोंडातील बॅक्टेरियामध्ये मिसळते आणि एक ऍसिड तयार करते, ज्यामुळे दातावरील कॅव्हिटी खराब होते. जागतिक आरोग्य संघटना WHO लोकांना साखरेचे सेवन मर्यादित करण्याचा सल्ला देतं. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की झोपण्यापूर्वी गोड पदार्थांचे सेवन केल्याने कॅव्हिटीचा धोका वाढतो.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा