Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

एमपीएससी कडून "या" 900 पदांवरील नोकरभरतीसाठी अर्ज करण्याला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ!

एमपीएससी कडून MPSC Group C Recruitment ला अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वी 17 जानेवारी असलेली अंतिम मुदत आता वाढवून 31 जानेवारी करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही या नोकरभरतीसाठी उत्सुक असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. दरम्यान उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी MPSC ची अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in ला भेट द्यावी लागणार आहे.

दरम्यान अर्ज सादर केल्यानंतर त्यामध्ये बदल करण्यासाठी 2 फेब्रुवारी 2022 पर्यंत वेळ असणार आहे. याकरिता प्रिलिम्स परीक्षा या 3 एप्रिल दिवशी होणार आहेत तर मुख्य परीक्षा 6 ऑगस्ट 2022 दिवशी होणार आहे. मग ज्यांना या सरकारी नोकरीमध्ये सामिल होण्याची इच्छा आहे त्यांनी खालील स्टेप्स फॉलो करत अर्ज सादर करणं आवश्यक आहे. UPSC ESE Prelims Exam 2022 ची तारीख जाहीर; upsc.gov.in वर पाहा वेळापत्रक .

MPSC Group C Recruitment कसा कराल अर्ज?
⏺️एमपीएससीची अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in ला भेट द्या.
⏺️होम पेज वर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन अर्जाच्या लिंक वर क्लिक करा.
⏺️नवीन पेज ओपन होईल तेथे तुम्हांला लॉगिन करावं लागेल.
⏺️तुमचे लॉगिन डिटेल्स भरल्यानंतर तुम्हांला सबमीट वर क्लिक करावं लागणार आहे.
⏺️अर्ज दाखल केल्यानंतर तुम्हांला अ‍ॅप्लिकेशनची फी देखील भरावी लागणार आहे.
⏺️पुढे सबमीट आणि डाऊनलोड वर क्लिक करा.
⏺️या अर्जाची हार्ड कॉपी देखील तुम्ही काढून ठेवू शकता.
⏺️या नोकरभरती मध्ये इंडस्ट्री इन्सपेक्टर साठी 103 जागा, डेप्युटी इन्सपेक्टर साठी 114 जागा, टेक्निकल असिस्टंट साठी 14 जागा, टॅक्स असिस्टंट साठी 117 जागा, मराठी क्लार्क-टायपिस्ट साठी 473 जागा तर क्लार्क-टायपिस्ट इंग्रजी साठी 79 जागांवर नोकरभरती होणार आहे. दरम्यान 22 डिसेंबर 2021 पासून यासाठी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे.


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा