Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता.?

तर काही भागात थंडी कायम...
मुंबई: 
राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असणारे अस्वच्छ हवामान आता पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र तरी पण अजूनही काही भागात थंडी जाणवत आहे.  

⏺️उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी आणि धुक्याचा प्रकोप आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत असेच वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 

⏺️यानंतर 3 फेब्रुवारीपासून वातावरण ढगाळ राहील आणि पावसाची शक्यता आहे.

⏺️पुढील काही दिवस थंडीपासून दिलासा मिळणार नसल्याचे हवामान खात्याचे सांगितले आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीचा जोर कमी होईल. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून थंडीची लाट सुरू आहे. तर, पावसानंतर हवेचे प्रदूषण सुधारू शकते.

⏺️आज मुंबईत कमाल तापमान 33 तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 188 वर नोंदवला गेला आहे.

⏺️पुण्यात कमाल तापमान 28 तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 156 वर नोंदवला गेला.


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा