रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद आरोग्य उपकेंद्रांना या वर्षी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणजेच समुदाय आरोग्य अधिकारी मिळणार आहेत. नुकतेच या कर्मचा-यांचे समुपदेशन झाले. या वर्षी तब्बल १४८ समुदाय आरोग्य अधिका-यांची नियुक्ती होणार आहे. या अधिका-यांची पात्रता बी.एस.सी. नर्सिंग किंवा बी.ए.एम.एस. अशी असते. आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी ए.एन.एम., एम.पी.डब्ल्यू. यांच्यासमवेत शासनाने निर्धारित केलेले विविध कार्यक्रम, आरोग्य विषयक उपक्रम यांच्यात मदतकार्य करणे हे मुख्य काम या समुदाय आरोग्य अधिका-यांना करावयाचे आहे. ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्रांना अनन्यसाधाराण महत्त्व आहे. त्यामुळे या अधिका-यांची नियुक्ती झाल्याने ग्रामिण भागातील रुग्णांना आरोग्य विषयक सेवा देण्यात अधिक सुलभता येईल. तसेच त्यांचे कार्य उपकेंद्रांच्या ठिकाणी अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. सदरची माहीती रत्नागिरी जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा