Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

मंडणगड आगार व्यवस्थापकांना धमकवणारा पोलिसांच्या ताब्यात

मंडणगड:
मंडणगड आगाराचे व्यवस्थापक हनुमंत फडतरे यांना धमकावणारा विनोद भोजू राठोड याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. याच्याविरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याने पोलिसांनी तोतयेगिरी करणार्या इसमास ताब्यात घेतले. या संदर्भात हनुमंत फडतरे यांनी 30 रोजी तक्रार दिली. त्यानुसार, 30 डिसेंबर रोजी आरोपी राठोड हा सकाळी11.00 वा. वाजण्याच्या सुमारास मंडणगड आगारात दाखल झाला. आगार व्यवस्थापकांची भेट घेत मी दापोली येथील महसूल अधिकारी असून मंडणगड आगाराच्या चौकशीकरिता आलो आहे, असे सांगितले. आगारातील किती कर्मचारी यांच्यावर कारवाई केली आहे? ही माहिती विचारत केलेली कारवाई ही चुकीची असून आगाराचा व विभाग नियंत्रक यांचा अहवाल मी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणार असल्याचे सांगितले.
आगार व्यवस्थापकांना संशय आल्याने त्यांनी आरोपीकडे ओळखपत्राची मागणी केली असता त्याने ते देण्यास नकार दिला. आगार व्यवस्थापकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले व तक्रार दिली. पोलिसांनी या इसमास ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा