कोरोनातून बरे झाल्यानंतर नागरिकांनी तीन महिन्यांनंतर कोरोनाची लस घ्यायची आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी दिली आहे.
केंद्र सरकारने सांगितले की संक्रमित आढळलेल्यांच्या लसीकरणात तीन महिन्यांचा विलंब होईल. त्यात 'बूस्टर' डोसचा देखील समावेश आहे.
सचिव शील म्हणाले की, कोविड -19 संसर्गाची चाचणी पॉझिटिव्ह आढळलेल्या नागरिकांना आता तीन महिन्यांनी बरे झाल्यानंतर डोस देण्यात येईल." यामध्ये बूस्टर डोसचा देखील समावेश आहे.
आयसीएमआरचे डीजी बलराम भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्यानंतर किंवा लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सुमारे नऊ महिने अँटीबॉडी असते.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा