रत्नागिरी प्रतिनिधी:-
पंचायत समिती रत्नागिरी यांच्याकडून कोतवडे गावातील दिव्यांग व्यक्तींना दिलेल्या युनिक कार्डचे वितरण तसेच दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी ग्रामपंचायत कोतवडे आणि क्षितिज स्पर्श फाउंडेशन कोतवडे यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना प्रमाणपत्र व कार्डचे वितरण मंगळवार दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी वितरित करण्यात आले. त्यावेळी उपस्थित सरपंच तुफील पटेल, सदस्या सौ प्रीती बारगोडे, ग्रामविकास अधिकारी देवीदास इंगळे, ग्रामकृती दल समिती सदस्या सौ.संयुक्ता मांडवकर, विलास परवडे, ग्रामस्थ पांडू वारेकर, महेश कांबळे, व लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा