रत्नागिरी:
घराच्या पाठीमागील दरवाजाला चक्क होल पाडून त्याव्दारे दरवाजाची कडी उघडत अज्ञाताने रोख 35 हजार रुपये लांबवले. ही घटना सोमवार 24 जानेवारी रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 3.45 वा.कालावधीत टी.सी.एम हायस्कुल जवळ मिशन कॅम्प येथे घडली.
याबाबत भारती भालचंद्र आंबेकर (45,रा.टीसीएम हायस्कुलजवळ, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानूसार,अज्ञाताने त्यांच्या बंद घराच्या मागील दरवाज्याला होल पाडून त्यावाटे दरवाजाची कडी काढून प्रवेश केला. त्यानंतर लाकडी कपाटातील कुलुप लावलेल्या स्टीलच्या डब्यातील रोख 35 हजार रुपये लांबवले.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार घोसाळे करत आहेत.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा