Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

बिबट्याने चिमुकल्याची पकडली मान; लेकरासाठी बाप भिडला अन् अखेर बिबट्या हरला..

पैशांसाठी माणुसकी विसरला सावकार, नवजात बाळाला आईच्या कुशीतून नेलं हिसकावून


गर्भवती महिला वनरक्षकाला मारहाण प्रकरण,माजी सरपंचाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
गर्भवती महिला वनरक्षकाला मारहाण प्रकरण,माजी सरपंचाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या


पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी लावली जिवाची बाजी; साताऱ्यात बापलेकाचा भयावह शेवट
पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी लावली जिवाची बाजी; साताऱ्यात बापलेकाचा भयावह शेवट


कोरेगाव नगरपंचायतीत आमदार शशिकांत शिंदेंना मोठा धक्का, शिवसेनेची एकहाती सत्ता
कोरेगाव नगरपंचायतीत आमदार शशिकांत शिंदेंना मोठा धक्का, शिवसेनेची एकहाती सत्ता

कराड, 21 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत रहिवासी परिसरात बिबट्या (Leopard) आढळून येत आहेत. अनेक ठिकाणी बिबट्या मानवीवस्तीत प्रवेश करुन माणसांवर हल्ला (Leopard attack on humans) करत असल्याचं दिसून आलं आहे. आता असाच एक प्रकार सातारा जिल्ह्यात घडला आहे. साताऱ्यातील कराड  येथे एका पाच वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने चिमुकल्याची मान पकडून त्याला पळवून नेताना मुलाच्या वडिलांनी त्याला रोखलं आणि अक्षरश: बिबट्याशी झुंज केली. काय घडलं नेमकं?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कराड तालुक्यातील करपे गावातील शेतकरी धनंजय देवकर हे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या शेतातून गावाकडे निघाले होते. त्यावेळी बिबट्याने धनंजय देवकर यांच्या पाच वर्षीय मुलावर बिबट्याने झडप घेतली. बिबट्याने धनंजय देवकर यांच्या मुलाची मान जबड्यात धरुन पळ काढण्याच्या बेतात असतानाच वडिलांनी प्रसांगवधान दाखवलं आणि बिबट्याला रोखलं.
धनंजय देवकर हे सायंकाळच्या सुमारास शेतातून घराकडे निघाले होते. त्यासाठी ते शेतातील आपलं साहित्य गोळा करुन पिशवीत ठेवत होते. तर त्यांचा पाच वर्षीय मुलगाही त्यांना या कामात मदत करत होता. त्याचवेळी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने पाच वर्षीय चिमुकल्यावर हल्ला करत त्याची मान पकडली. धनंजय यांनी आपल्या मुलाला पकडून ठेवलं. तर दुसऱ्या बाजुला तारेचं कुंपन असल्याने बिबट्याला पळ काढता आला नाही.
धनंजय देवकर यांनी आपल्या चिमुकल्यासाठी थेट बिबट्याशी झुंज दिली. यावेळी धनंजय देवकर यांनी मुलाचे प्राण वाचवण्यासाठी जोरदार आरडाओरड सुद्धा केला. बराच वेळ बिबट्याला भिडल्यानंतर अखेर बिबट्याने हार मानत तेथून धूम ठोकली. बिबट्याने केलेल्या या हल्ल्यात पाच वर्षीय मुलगा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान कराडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण साताऱ्यातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याला वनविभागाने तात्काळ पकडावे अशी मागणी होऊ लागली आहे.
या प्रकरणाची माहिती स्थानिक वन अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच कराड येथील वन अधिकारी यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देऊन धनंजय देवकर यांची आणि त्यांच्या मुलाच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. आता वन विभाग या बिबट्याला कधीपर्यंत आपल्या जाळ्यात अडकवतं हे पहावं लागेल.
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा