Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गोवा राज्यातील मांद्रे विधानसभा मतदार संघातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रचारकांना मार्गदर्शन

गोवा राज्याचे भाजपा चे निरीक्षक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांद्रे विधानसभा मतदार संघाचे भाजपा उमेदवार दयानंद सोपटे यांच्या प्रचारार्थ शक्ती केंद्र प्रमुख व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती .यावेळी मांद्रे विधानसभा मतदार संघाचे प्रचारप्रमुख व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली आलेली सिंधुदुर्ग भाजपा टीमशी चर्चा केली , तसेच प्रचाराची रणनीती कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले . यावेळी रघुनाथ कुलकर्णी उपस्थित होते .
  तसेच जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , जिल्हा चिटनीस मनोज नाईक , व्यापार आघाडीचे विजय केनवडेकर , वेंगुर्ले मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर , सावंतवाडी मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , वेंगुर्ले तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , सावंतवाडी नगरसेवक आनंद नेवगी , मालवण नगरसेवक गणेश कुशे , किसान मोर्चा चे बाळु प्रभु व अनील सावंत , राजु राऊळ , वेंगुर्ले ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस इत्यादी उपस्थित होते.
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा