दापोली 21 जानेवारी:* दापोली केळस्कर नाका येथील आसरा पुलाजवळ दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र रामचंद्र मळेकर (43, रविकिरण अपार्टमेंट, उद्यमनगर, दापोली) हे आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन आर्थिक हॉटेल ते रुपनगर दापोली असा प्रवास करत होते. यावेळी बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे केळस्कर नाका आसरा पुलावर गाडी स्लिप झाली. यात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार संदीप गुजर यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार दुचाकी स्वार महेंद्र मलेकर यांच्या विरोधात भादवी कलम 304 (अ), 279, 337, 338 मोटर वाहन कायदा कलम 184, 146/ 196 नुसार 20 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पड्याळ करत आहेत.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा