राजापूर तालुक्याच्या किनारपट्टीवरील वेत्ये तिवरे येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची नवीन वर्षामध्ये दोनवेळा अंडी सापडलेली असताना आता शुक्रवारी
सकाळी पुन्हा एकदा या प्रजातीच्या कासवाची अंडी वेत्ये तिवरे कासवाच्या समुद्रकिनारी सापडली त्यात कासवमित्र गोकुळ जाधव यांना तब्बल ९४ अंडी
सापडली असून , त्यांचे सुरक्षितपणे संवर्धन करून ठेवण्यात आले आहे. आहेत. तालुक्याला लाभलेल्या
वेत्ये - तिवरे समुद्र किनावर या वर्षी कासवांच्या अंड्यांच्या संवर्धनासाठी या वर्षीचे तिसरे घरटे झाले आहे. गेल्या वीस दिवसांमध्ये या ठिकाणी तीनवेळा
२६८ कासवाची अंडी सापडली आहेत. नव्या वर्षाच्या शुभारंभाला वेत्ये तिवरे समुद्र किनारी मागील वीस दिवसांमध्ये कासवमित्र गोकुळ जाधव यांना दोनवेळा
अंडी सापडली आहेत.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा