खेड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन शाळकरी मुलीचे लैंगिक शोषण करून तिला व्हिडीओ कॉल
करून धमकवणाऱ्या शिक्षकाविरोधात खेड पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील एका शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे २ डिसेंबर २०२१ ते १० जानेवारी २०२२ या कालावधीत श्रीकांत बिरा मासाळ(४१, रा. भरणेनाका , खेड मूळ गाव मोरवडे , ता.मंगळवेढा , जिल्हा सोलापूर ) या शिक्षकाने लैंगिक शोषण केले. तीला व्हॉट्सअॅपवर मेसेज करून शिवीगाळ केले तसेच व्हिडीओ कॉल करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकाराने घाबरलेल्या
पीडित अल्पवयीन मुलीने आपल्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दि. १८ रोजी पोलिसांनी शिक्षकाविरोधात भारतीय दंड
विधान कलम ३५४ , ५०४ , सह लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा