Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

आजची रेसिपी:पनीर चीज पराठे

साहित्य:
• दीड कप कणीक
• पाव किलो पनीर
• अर्धा चमचा कांदा मसाला
• अर्धा चमचा जिरे पूड
• अर्धा चमचा धणेपूड
• अर्धी वाटी चीज स्प्रेड
• अर्ध वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
• दोन मिरच्या बारीक चिरून
• अर्धा चमचा साखर , अर्धा कप मैदा
• डाळीचं पीठ पाव कप , लाटायला मैदा
• एक कांदा बारीक चिरून
• एक डाव तेल , तूप वरून सोडायला .
 

कृती:
• कणीक , मीठ , मैदा आणि डाळीचं पीठ एकत्र करून डावभर गरम तेल घालून मऊ भिजवावं .
• पनीर किसून त्यात कांदा , कोथिंबीर , मिरच्या , धने-जिरे पूड , कांदा मसाला , साखर घालून हलक्या हातानं मिसळावं .
• भिजवलेल्या पीठाचे दहा गोळे करून त्याच्या पातळ पोळ्या लाटाव्यात .
• मग एक पोळी घेऊन तिच्या अर्ध्या भागावर चीज स्प्रेड हातानं लावावं .
• त्यावर पनीर मिश्रण पसरवावं व पोळीच्या उरलेल्या अर्ध्या भागनं ते झाकून  कडा दाबून चिकटवाव्या .
• त्यावरून हलकेच लाटणं फिरवावं व तव्यावर तूप सोडून अशा घडया केलेले पराठे भाजावेत .  लोणचं किंवा पुदिन्याच्या दह्याबरोबर दयावेत .
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा