शहरातील मुरुगवाडा येथील साडी सेंटरच्या बाजुला बेकायदेशिरपणे जुगार चालवणार्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई 27 जानेवारी रोजी दुपारी 1.40 वा.करण्यात आली असून त्याच्याकडून 4 हजार 540 रुपये व जुगाराचे इतर साहित्य जप्त करण्यात आले.
मनिष मोहन लाड(35, रा. मुरुगवाडा पंधरामाड, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात पोलिस हवालदार नितीन प्रभाकर डोमणे यांनी तक्रार दिली असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा