येथे गुरुवारी रात्री खालची आळी येथील दोन तरुणांना बिबट्याचे दर्शन झाले असून त्याचा भरवस्तीत वावर वाढला असल्याचे स्पष्ट होत आहे.देवरुख खालची आळीतील तुषार करंडे व संदेश सुवारे हे दोघे गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास कांजिवरा इथून घरी परतत होते याचवेळी सार्दळ यांच्या निवासस्थानानजीक मुख्य रस्त्यावरून बिबट्याने थेट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला झेप घेतली.
जंगले नष्ट झाल्याने व भक्ष्य मिळत नसल्याने हे बिबटे मानवी वस्तीत शिरत असल्याचे बोलले जात आहे. एक
महिन्यापूर्वी याच ठिकाणी नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा