Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

आजचे राशीभविष्य ०९ जानेवारी २०२२ : भानुसप्तमी, राशींवर सूर्य देवाची कृपा असेल

रविवार ०९ जानेवारी रोजी चंद्र दिवस-रात्र मीन राशीत संचार करेल. जिथे चंद व सूर्य एकमेकांच्या केंद्रस्थानी राहून शुभ स्थिती निर्माण होईल. आज मार्तंड सप्तमी देखील आहे, म्हणजेच असा दिवस जिथे सूर्यदेवाचा जन्म मार्तंड स्वरूपात झाला होता. तेव्हा या स्थितीत सूर्य देवाच्या कृपेने आजचा दिवस सर्व राशींसाठी कसा असेल ते पाहुया...

मेष
घरातील सदस्याची तब्येत सुधारावी म्हणून काही लोकांना खर्च करावा लागू शकतो. अध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ असेल. एखाद्या अध्यात्मिक गुरूशी तुमची भेट होऊ शकते. परदेशी संबंधित व्यवसाय असल्यास मित्र किंवा नातेवाईकांकडून लाभ होऊ शकतो. कोणाकडून उधार घेतले असल्यास ती व्यक्ती ते परत मागू शकते. आज ७५% नशिबाची साथ आहे. शिव चालिसाचे वाचन करा.

वृषभ
चंद्र लाभ स्थानी असल्याने आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक सिद्ध होईल. संध्याकाळच्या वेळी चित्रपट पाहण्याची योजना असेल. व्यापाऱ्यांना आज चांगला प्रोजेक्ट मिळू शकतो. घरातील आवश्यक सामानाची खरेदी करण्यात पैसे खर्च होऊ शकतात. आज ९०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगावर दुध अर्पण करा.

मिथुन
कौटुंबिक जीवनात चांगले बदल दिसून येतील. वडिलांच्या सहाय्याने घरातील महत्वाची कामे मार्गी लागतील. दिवसा एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. धार्मिक कार्यातील आवड वाढेल तसेच धार्मिक पुस्तकाचे वाचन सुद्धा काही लोकं करू शकतात. आज ८५% नशिबाची साथ आहे. रामचरितमानसमधील अध्यायाचे वाचन करा.

कर्क
धार्मिक कामांमध्ये आवड वाढेल. आज सुट्टीचा दिवस असल्याने या राशीचे काही लोकं पूजाघराची साफ-सफाई करताना दिसतील. मित्रांच्या मदतीने काहींना धनलाभ होऊ शकतो. मनात एखादी सल किंवा चिंता असल्यास तुम्ही ती जोडीदारासमोर व्यक्त करू शकता. आज काही लोकांची एखादी पोस्ट सोशल मिडीयावर सर्वत्र पसरू शकते. आज ८८% नशिबाची साथ आहे. शिव-पार्वतीची पूजा करा.

सिंह
या राशीच्या लोकांना खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्याचे नुकसान होऊ शकते. तर काही लोकं आज सगे-सोयऱ्याना भेटू शकतात व ही भेट फायद्याची ठरेल. आईच्या तब्येतीबाबत काळजी वाटेल. कला क्षेत्रातील लोकांना त्यांच्या एखाद्या कलाकृतीबाबत शाबासकी मिळू शकते. आज ७६% नशिबाची साथ आहे. आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा.

कन्या
जोडीदाराबरोबर आनंदाचे क्षण वेचायला मिळतील. संध्याकाळी मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाऊ शकता. भागीदारीत व्यवसाय करण्याचा विचार असल्यास तुम्ही याबाबत घरातील मंडळींबरोबर चर्चा करू शकता. कन्या राशीच्या लोकांनी नशिबावर अवलंबून राहू नये, अथक मेहनत घेतली पाहिजे. आज ८२% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या.

तूळ
आज या राशीचे काही लोकं मर्यादेपेक्षा जास्त वेळ सोशल मिडीयावर घालवू शकतात. तंदुरुस्तीसाठी जिथे शारीरिक कसरत करावी लागेल असे खेळ खेळावेत. आज विरोधकांपासून सावधान राहणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत कमतरता दिसून येईल. आज ७०% नशिबाची साथ आहे. पांढऱ्या वस्तूंचे दान करा.

वृश्चिक
आज या राशीचे लोकं जेवढ्यास तेवढे बोलतील व जास्तीत जास्त वेळ एकांतात घालवतील. गुरुजनांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणक्षेत्रातील अडचणी दूर होतील. प्रियकर-प्रेयसी तुमचे मन ओळखून संध्याकाळी तुम्ही दोघ एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवाल. घरातील वरिष्ठ लोकांच्या वागण्या-बोलण्यात लक्ष घालण्यापासून लांब राहा. आज ८२% नशिबाची साथ आहे. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा.

धनू
आज सुट्टीचा दिवस असल्याने चित्रपट पाहू शकता किंवा घरातील सदस्यांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. आज आईकडून आर्थिक मदत होईल. तब्येतीत देखील चांगले बदल घडून येतील. करियर मध्ये चांगले परिणाम मिळवण्यासाठी आज तुम्ही एखाद्या जवळच्या नातेवाईकाशी संवाद साधताना दिसून याल. आज ०% नशिबाची साथ आहे. महामृत्युंजय मंत्राचा जप करा.

मकर
आत्मविश्वासात वाढ होईल. वाहन चालवताना काळजी घ्या, वेगात गाडी चालवू नका. लहान भावंडाकडून लाभ मिळू शकतो. अति मसालेदार पदार्थ तब्येतीला त्रासदायक असू शकतात. म्हणून खाण्या-पिण्याची काळजी घ्या. आज ८२% नशिबाची साथ आहे. चुकीचे बोलू नका आणि इतरांचे मन दुखावू नका.

कुंभ
रिकाम्या वेळेत मनोरंजनपर पुस्तक वाचू शकता किंवा धार्मिक मालिका पाहू शकता. पैशांशी संबंधित चांगले परिणाम या राशीतील लोकांना मिळतील. गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. व्यवसाय सुरु करायचा असल्यास घरातील मोठ्या व्यक्तीशी याबाबर संवाद साधू शकता. पाठीमागे एखाद्याबाबत वाईट-साईट बोलणे टाळा अन्यथा त्याचा तुमच्या प्रतिमेवर वाईट परिणाम होऊ शकतो. आज ८४% नशिबाची साथ आहे. कृष्णाची पूजा करा.

मीन
आज धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवता येईल, काही लोकं जोडीदाराबरोबर भविष्याची योजना करू शकतात. जुन्या दीर्घकाळ आजारापासून काही लोकांची सुटका होऊ शकते. गरजेपेक्षा जास्त बोलणे तुमच्यासाठी नुकसानीचे सिद्ध होऊ शकते. आज ८४% नशिबाची साथ आहे. गुरुजनांचा आशीर्वाद घ्या.
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा