Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

दापोलीत बेकादेशीर सागवान तोड; वनविभागाने केली तिघांना अटक

दापोली:

दापोली तालुक्यातील वनपरिक्षेत्रात बांधतीवरे शिवाजीनगर येथे 3 सागवान प्रजातीची झाडे अनधिकृतपणे तोडल्या याप्रकरणी सुनील धोपट गिम्हवणे भोंजाळी, राजेश दुसार बांधतिवरे वेताळवाडी, प्रमोद वाडकर जालगाव ब्राह्मणवाडी या तिघांना परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

सदर चोरीच्या झाडांचे चिरकाम दापोली मधील लक्ष्मी विजय स्वॉमील येथे केले असल्याचे आढळून आले.या प्रकरणी साॅमिल धारकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना 7 जानेवारी रोजी घडली. परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार 7 जानेवारी रोजी बांधतीवरे येथे वन कर्मचारी फिरती करिता गेले होते.

सदर फिरती दरम्यान शिवाजीनगर बांधतिवरे येथील 3 सागवानी झाडे तोडून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा वनरक्षक बांधततिवरे यांनी भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 अन्वये गुन्हा नोंद केला.
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा