यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. याच जामीन अर्जावर आज जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र यापूर्वी नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक (पीए) राकेश परब हे कणकवली पोलिसांना शरण गेल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानंतर कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर ही पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. पीए राकेश परब यांना अटक होऊन न्यायालयात हजर केले जाईल. तसेच जिल्हा न्यायालयात आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. या अर्जावर न्यायाधीश आर.बी.रोटे यांच्या न्यायालयात प्राथमिक सुनावणी होणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर काय होणार? याकडे ही सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.
⏺️काय आहे संतोष परब हल्ला प्रकरण?
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आमदार नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायाधीश आर.बी.रोटे यांच्या न्यायालयात प्राथमिक सुनावणी होत न्यायालयाने याबाबत सोमवारी ३१ जानेवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे नितेश राणे यांना अटक होणार की नाही? याबाबत आज स्पष्ट होणार आहे.
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर २०२१ रोजी अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा