Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

"आम्ही कुणाला वाइन प्या असे म्हणू...."



आम्ही कुणाला वाइन प्या असे म्हणू शकत नाही, म्हणणारही नाही - राजेश टोपे

राज्य सरकारने द्राक्षापासून तयार होणारी वाईन सुपरमार्केट विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर त्यावरुन चांगलाच गोंधळ सुरु झाला आहे. 

अनेकजण शेतकऱ्यांना या निर्णयामुळे फायदा होईल, असं सांगत आहेत. तर विरोधी पक्ष याला कडाडून विरोध करत आहेत. अशात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोलापुरात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. 
 
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे की, आम्ही कुणाला वाईन प्या असे म्हणू शकत नाही, म्हणणारही नाही. मद्यपान करु नये हाच महत्वाचा विषय आहे. तरीसुद्धा जगात सिगारेटसारख्या वस्तू सूचना देऊन विकल्या जातात.  

मद्यपानाला आरोग्य विभाग कधीही प्रोत्साहन देऊ शकत नाही. शेतकरी, द्राक्ष बागायतदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी किराणा दुकानात आणि मॉलमध्ये वाइन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे, असं टोपे म्हणाले.

टोपे म्हणाले की, वाईन उद्योगामुळं शेतकरी, द्राक्ष बागायतदारांचं उत्पादन वाढावं म्हणून हा निर्णय घेतला आहे. जे उत्पादन होतं त्या विक्रीसाठी एक योग्य मार्केटिंगच्या संदर्भानं एक सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आरोग्य विभाग मद्यपानाला कधीच प्रोत्साहन देणार नाही, असंही ते म्हणाले.

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा