चिपळूण : नगरपरिषद प्रशासनाकडून शहरात पुन्हा अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. चिपळूण बाजारपेठेतील गांधी चौक, पूजा थिएटर, पानगल्ली, नाथ पै चौक, एक दिशा मार्ग आदी भागातील अतिक्रमणांवर कारवाई सुरू करण्यात आली अनेकवेळा नागरिकांकडून तक्रारी करूनही संबंधितांकडून दुर्लक्ष केले जात होते.
मात्र शुक्रवारी पथकाकडून कारवाई सुरू होताच संबंधित पन्नासहून अधिक व्यावसायिकांनी आपापला माल दुकानाच्या आतमध्ये घेण्यास सुरुवात केली आहे. दुपारपर्यंत पानगल्ली परिसरातही पथकाकडून कारवाईला सुरुवात होताच अनेक व्यापार्यांनी पानगल्लीतील भाजी व्यवसाय लगतच्या दुकानात सुरू ठेवले.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा