रत्नागिरीत मत्स्यबीज केंद्र सुरू करणार -पालकमंत्री
शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना जिल्ह्यातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहचवून जिल्हा सुजलाम सुफलाम करु या. पर्यटन विकासातून जिल्हा जगाच्या नकाशावर आणायचा आहे कोकणात मत्स्य व्यवसाय मोठा आहे केरळ , बंगळूरुप्रमाणे रत्नागिरीत मत्स्यबीज केंद्र सुरु करणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री राज्याचे तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अँड. अनिल परब यांनी केली. कोविड-१९ च्या महामारीच्या काळात ज्यांनी समाजाचे आरोग्य राखण्यासाठी अपार मेहनत केली अशा सर्वांचा या प्रसंगी आवर्जून उल्लेख करतो असे सांगून पालकमंत्री म्हणाले , कोविड १९ च्या संकटातून आता आपण बाहेर पडण्याच्या मार्गावर आहोत.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा