मुंबई :
किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीस मंजुरी दिल्यावरून भाजपा नेते महाविकास आघाडी सरकारवर तुटून पडले आहे. सरकार मात्र या निर्णयाचे समर्थन करीत त्याचे फायदे सांगत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा निर्णय योग्य ठरवित विरोधकांवर निशाणा साधला आहे.
सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. वाईन विक्रीतून जर चांगल्या पद्धतीने विक्री वाढून निर्यात वाढली तर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. त्यातून शेतकऱ्यांच्या मालाला भाव चांगला मिळेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढेल. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित आहे. जे राजकीय पक्ष याचा विरोध करत आहेत, त्यांनी याचा विचार करावा. त्यांनी शेतकऱ्याचं आर्थिक गणित समजून घ्यावे, असे राऊत म्हणाले.
वाईन हे शेतकरी पिकवत असलेल्या फळांपासून बनवता येणारे उत्पादन आहे. त्याला मद्याचा दर्जा आहे का माहीत नाही. असेल तर देशात दारूबंदी आहे का? द्राक्ष, चिकू, काजू, पेरू, बडीशेप हे शेतकऱ्यांचे उत्पादन आहे. यापासून दारू बनवली तर शेतकऱ्यांच्या या मालाला भाव येईल. त्यांचे उत्पन्न वाढेल. शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली होईल. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. जे राजकीय पक्ष टीका करत आहेत त्यांनी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित समजून घ्यावे. नाही तर हे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. कारण ते शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे असे राऊत म्हणाले.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा