पुणे 21 जानेवारी:* पुण्यात ओमायक्रॉनचा विस्फोट झाला असून एकाच दिवसात तब्बल 125 रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची तारांबळ उडाली आहे. गेल्या २४ तासात राज्यात ४६,१९७ नव्या करोनाबाधितांची भर पडली असून ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात ५२,०२५ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
दरम्यान राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत रोज चढ-उतार होत असल्याचं दिसून येत आहे. गुरुवारी राज्यात १२५ ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली असून हे सर्व रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत. त्या आधी बुधवारी २१४ ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत आजची संख्या जवळपास ९० ने कमी आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण २१९९ ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ११४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ८६५ ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद ही पुणे शहरात करण्यात आली आहे. तर त्या खालोखाल मुंबईचा क्रमांक लागत असून त्या ठिकाणी ६८७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा