नवी दिल्ली :
काही दिवसांपूर्वी एका कर्णधाराने स्पॉट-फिक्सिंगबाबत मोठा खुलासा केला होता. या खेळाडूला आता आयसीसीने मोठा दणका दिला आहे, त्याचबरोबर त्याच्यावर बंदीचा कारवाई केली आहे.
⏺️आयसीसीने काय कारवाई केली?
पाहा..
झिम्बाब्वेचा कर्णधार ब्रेंडन टेलरला स्पॉट-फिक्सिंग करण्यासाठी ब्लॅकमेल केले जात होते. पण तरीही टेलरने स्पॉट फिक्सिंग केले नाही. पण तरीही ही गोष्ट वेळेत सांगितली नाही म्हणून आयसीसीने त्याला साडे तीन वर्षांची बंदीची शिक्षा ठोठावली आहे. त्याचबरोबर कोकेन सेवनप्रकरणी त्याच्यावर एका महिन्याची बंदी घालण्यात आली आहे.
⏺️नेमकं काय घडलं होतं?!
ब्रेंडन टेलरने याबाबत सांगितले की, " एका भारतीय व्यवसाइकाने माझा कोकीन ड्रग्स घेतानाचा व्हिडिओ शूट केला होता. त्यानंतर तो मला स्पॉट फिक्सिंगसाठी ब्लॅकमेल करू लागला. असे न केल्यास संबंधित व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. अर्थात टेलरने हे देखील स्पष्ट केले की, त्याने कधीच संबंधित भारतीय व्यक्तीची गोष्ट ऐकली नाही आणि सर्व सामने अत्यंत प्रामाणीकपणे खेळले. जेव्हा मी भारतात त्या व्यक्तीला भेटलो. त्या दिवशी रात्री आम्ही मद्य घेतले आणि त्याने मला कोकीन घेण्याची ऑफर दिली. तो स्वत: कोकीन घेत होता आणि मी देखील त्यांच्या जाळ्यात फसलो. दुसऱ्या दिवशी सकाळी तेच लोक माझ्या हॉटेलमधील रुममध्ये घुसले आणि मी ड्रग्स घेत असलेला व्हिडिओ दाखवला. जर मी त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यात स्पॉट फिक्स केले नाही तर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यांनी मला १५ हजार डॉलर दिले आणि काम झाल्यानंतर २० हजार डॉलर देणार असल्याचे सांगितले. पण मी कधीच मॅच फिक्सिंगच्या कोणत्याही प्रकारात सहभागी झालो नाही. मी काहीही असू शकतो पण धोका देणारा नाही." टेलरने झिम्बाब्वेसाठी ३४ कसोटी, २०५ वनडे आणि ४५ टी-२० सामने खेळले आहेत. ३५ वर्षीय टेलरने सप्टेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा