Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

आता X-raysच्या माध्यमातून कोरोना, ओमिक्रॉनची लागण झालेय की नाही कळणार, वैज्ञानिकांचा नवा शोध

 जगभरात कोरोनाची दहशत अजूनही कायम आहे. दररोज लाखोंनी नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळापासून कोरोनाची लक्षणे दिसताच त्याचे निदान होण्यासाठी काही चाचण्या केल्या जातात. मग त्यामध्ये आरटीपीसीआर, अँटीजन चाचणी, रॅपिड टेस्ट अशा चाचण्याद्वारे कोरोना, ओमिक्रॉनचे निदान म्हणजेच कोरोना किंवा ओमिक्रॉन झाला आहे की नाही ते समजते. पण आता कोरोना आणि ओमिक्रॉन झाला आहे की नाही, हे एक्स-रेद्वारे समजू शकते. ते कसे जाणून घ्या…


स्कॉटलँडमध्ये वैज्ञानिकांच्या एका गटाने
 कोरोना महामारीवर एक नवा प्रयोग केला आहे. ज्या अंतर्गत आता एक्स-रे (X-rays)चा वापर करून कोरोना झाला आहे की नाही हे समजेल. याला वैज्ञानिकांनी ९८ टक्के अचूक मानले आहे. या चाचणीत एखाद्या व्यक्तीमध्ये व्हायरस उपस्थितीत असल्याचे शोधण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय)चा वापर करते.

संशोधकर्त्यांनी सांगितले की, एक्स-रेच्या माध्यमातून करणारी चाचणी ही आरटी-पीसीआर चाचणीपेक्षा वेगाने असते आणि याचा परिणाम ५ ते १० मिनिटात समजतो. आरटी-पीसीआर चाचणीचे रिपोर्ट येण्यासाठी एक तासांहून अधिक वेळ लागतो. बऱ्याच काळापासून एक त्वरित आणि विश्वसनीय उपकरणाची आवश्यकता होती, जे कोरोनाचे निदान करू शकेल. एवढेच नाहीतर एक्स-रेच्या माध्यमातून ओमिक्रॉन व्हेरिएंटची सुद्धा लवकरात लवकर निदान होऊ शकेल.

यूडब्ल्यूएकच्या शोधकर्त्यांच्या माहितीनुसार, नवीन तंत्र एक्स-रेचा वापर करून ३ हजारांहून अधिक प्रतिमांचा डेटाबेसशी स्कॅनची तुलना करते, जे कोरोना रुग्ण, निरोगी व्यक्ती आणि व्हायरल निमोनियाशी संबंधित आहेत. तसेच या तंत्रज्ञानात आर्टिफिशिअल इंटेलिंजेस प्रक्रियेची मदत घेतली जाते. जे दृश्य आकलनाचे विश्लेषण करण्यास आणि निदान करण्यासाठी एका अल्गोरिदमचा वापर करतात. दरम्यान हे तंत्रज्ञान एका चाचणीच्या टप्प्यात ९८ टक्क्यांहून अधिक अचूक असल्याचे सिद्ध झाले आहेत.

प्रोफेसर रमझान म्हणाले की, ‘अनेक देश मर्यादित निदान उपकरणांमुळे मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करू शकत नाहीत. परंतु आमच्या संशोधनातून व्हायरसचे निदान लवकर होते. व्हायरसच्या गंभीर प्रकरणांचे निदान करताना हे महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान म्हणून सिद्ध होऊ शकते. तसेच कोणत्या उपचारांची आवश्यकता असू शकते हे देखील निर्धारित करण्यास मदत होते.’

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा