मध्य रेल्वेने मुंबई विभागात ठाणे आणि दिवा स्थानकदरम्यान 72 तासांचा मेगा ब्लॉक घोषित केला असल्याचे माहिती पत्रक सोशल मीडियावर फिरत असून तसे झाल्यास कोकण रेल्वे मार्गांवरील अनेक गाड्या 5 आणि 6 फेब्रुवारीला रद्द होऊ शकतात. जवळपास संपूर्ण मार्गदर्शन ठप्प होण्याचीच शक्यता वर्तवली जातं आहे. मात्र याबाबत कोकण रेल्वेकडून अद्याप कोणतेही अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.
एकीकडे कोरोनाच्या ओमायक्रोन चा प्रादुर्भाव कमी होत असताना राज्यातील अनेक निर्बंध शिथिल होत आहेत. असे असतानाच मध्य रेल्वे ने मुंबई विभागात ठाणे ते दिवा या स्थानकादरम्यान 5 आणि 6 फेब्रुवारी दरम्यान मेगा ब्लॉक घोषित केल्याचे एक पत्रक सोशल मीडियावर फिरत आहे.
असा मेगा ब्लॉक झाल्यास कोकण रेल्वे प्रवासावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. या कालावधीत जवळपास 20 गाड्या रद्द होण्याची, काही गाड्यांच्या वेळा बदलण्याची शक्यता आहे किंवा कमी थांब्यांच्या गाड्या सोडण्याची शक्यता आहे.
मात्र याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. 5 आणि 6 हे दोन दिवस विकएंड असल्याने अनेक प्रवासी या मार्गांवरून प्रवास करण्याची शक्यता असताना अद्यापही या मेगाब्लॉक बद्दल रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याने प्रवासी संभ्रमात आहेत.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा