माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते कुवेशी गावातील दोन रस्त्यांच्या कामांचा भूमिपुजन कार्यक्रम संपन्न
माजी विधान परिषद आमदार, राजापूरातील कॉंग्रेस नेत्या, प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते राजापूर तालुक्यातील कुवेशी गावातील दोन रस्त्यांच्या भूमिपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कुवेशी गावातील तुळसुंदे फाटा पाटणकर बाग ते तेली वाडी स्मशानभूमी पर्यंत रस्ता अंदाजित रक्कम दहा लाख, कुवेशी येथील पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्ता ते गावकर वाडीतून स्मशानभूमी होळी जोडरस्ता अंदाजित रक्कम दहा लाख या दोन कामांच्या भूमिपुजनाचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जनसुविधा योजनेतून हे रस्ते मंजूर झाले आहेत. ही कामे मंजूर करुन घेण्यासाठी माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी विशेष प्रयत्न केले. सदर भूमिपूजन कार्यक्रमावेळी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, ज्येष्ठ नेते सरफूद्दीन काझी, जिल्हा कॉंग्रेस सदस्य संजय कुवेसकर, कुवेशीच्या सरपंच मोनिका कांबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर कांबळे, कॉंग्रेसचे वैभव कुवेसकर, युवक कॉंग्रेस विधानसभा क्षेत्राध्यक्ष नुईद काझी आदींसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा