राजापूर शहरात बुधवारी ९ फेब्रुवारी रोजी महावितरणचे एक गाव एक अभियान: माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांचा पुढाकार
महावितरणचे राजापूर उपविभागीय कार्यालय एक आणि शहर महावितरण यांच्या विद्यमाने बुधवारी नऊ फेब्रुवारी रोजी राजापूर शहरात "एक गाव एक अभियान" अर्थात महावितरण आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. माजी नगराध्यक्ष अॅड . जमीर खलिफे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. राजापूर शहरात कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून, माजी आमदार हुस्नबानू खलिफे तसेच माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे विविध विकास कामांना मंजू-या मिळाल्या. विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत. तर बरीचशी प्रस्तावित विकास कामे पूर्ण देखील झाली आहेत. याचाच एक भाग म्हणुन राजापूर शहरातील महावितरणच्या अखत्यारीत असलेल्या शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी पुढाकार घेतला आहे. बुधवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सव्वासहा या संपूर्ण दिवसाच्या कालावधीत महावितरणचे अधिकारी तसेच तांत्रिक कर्मचारी जवाहर चौक येथील न.प.च्या पिकअपशेड सभागृहात उपस्थित रहाणार आहेत. या कालावधीत शहरातील वीज ग्राहकांच्या समस्यांचे तत्काळ निवारण करण्यात येणार आहे. निराकरण या अभियानांतर्गत ग्राहकांच्या वीज बिलविषयक तक्रारींचे करून बिल दुरूस्ती करण्यात येईल. तात्पुरत्या स्वरूपातील वीज खंडीत ग्राहकांची वीज बिल वसूली करण्यात येईल. नादुरूस्त मिटर्स बदलण्यात येतील. गंजलेले पोल आणि ट्रान्सफार्मरचे स्थळ परिक्षण केले जाईल व ते बदलण्यात येतील, विद्युत अपघात टाळण्यासाठी विद्युत सुरक्षा संबंधित नागरिकांत जनजागृती केली जाईल. गंजलेले लघुदाब वाहिनेचे पोल बदलण्यात येतील, ग्राहकांना महावितरण मोबाईल अॅप प्रामुख्याने ऑनलाईन पेमेंट याबद्दल माहिती देऊन वापरण्याचे आवाहन केले जाईल. लघुदाब वाहिन्यांवरील ट्री कटींग तसेच लूज गाळयातील तारा ओढण्यात येतील . शून्य व १-३० युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांची स्थळतपासणी करण्यात येईल. यासारखी अनेक कामे तत्काळ मार्गी लावण्याच्या दृष्टीने हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाचे नियोजन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अनिलकुमार डोंगरे तसेच सहा अभियंता चिन्मय चिवटे यांनी केले आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा