Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

सचिन विरुद्ध विराट,कोण सर्वोत्तम फलंदाज; उत्तर देऊन सचिनने विषय संपवला!


नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये नेहमीच ही चर्चा होते की सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यापैकी सर्वोत्तम फलंदाज कोण आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजही अधिकतर विक्रम सचिनच्या नावावर आहेत. दुसऱ्या बाजूला विराट कोहलीने देखील शानदार कामगिरी करून सचिनच्या अनेक विक्रमांच्या जवळ पोहोचला आहे. सचिनच्या १०० शतकांचा विक्रम विराटच मोडू शकतो असे म्हटले जाते.

या दोन्ही क्रिकेटपटूंच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. फक्त क्रिकेट चाहते नाही तर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक यांच्यात देखील चर्चे होत असते. पण हाच प्रश्न जेव्हा सचिन तेंडुलकर याला विचारण्यात आला तेव्हा त्याने काय उत्तर दिले असेल याची उत्सुकता सर्वांना होती. ग्राहम बेनसिंगर यांना दिलेल्या मुलाखतीत वरील प्रश्नाचे उत्तर मिळाले. बेनसिंगर यांनी सचिन की विराट असा प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला, किती चांगले होईल जेव्हा दोन्ही एकाच संघाकडून खेळतील.

सचिनला गोल्फ खेळण्यास आवडते. बेनसिंगर यांनी विचारले की, गोल्फमध्ये एकही शॉटमध्ये होल करण्यास आवडेल की क्रिकेटमध्ये द्विशतक करण्यास. यावर सचिन म्हणाला, आधी क्रिकेटमध्ये द्विशतक आणि नंतर होल इन वन केले तर किती चांगले होईल.

काही वर्षापूर्वी विराट कोहलीला त्याची आणि सचिनच्या तुलनेवर प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा विराट म्हणाला होती की, मी सचिनच्या जवळपास देखील नाही. गौरव कपूर यांना दिलेल्या मुलाखतीत विराट म्हणाला होता की, तुम्ही फक्त त्याच्याशी तुलना करू शकता ज्यांच्याशी केली जाऊ शकते. तुम्ही माझी तुलना अशा व्यक्तीशी करत आहात ज्यांच्यामुळे मी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. मी त्याच्या जवळपास देखील नाही. मी नेहमी हे म्हणतो की, त्यांनी आम्हाला दिले आहे. त्याच्या आमच्या सोबत तुलना होऊ शकत नाही. या पिढीशीतर नाहीच नाही.
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा