Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रत्नागिरी:"येथे"तरुणाला दोघा अज्ञातांकडून लोखंडी रॉडने मारहाण

रत्नागिरी:
शहरातील डी.एस. भोसले प्लाझा समोर अज्ञात कारणावरुन तरुणाला लोखंडी राॅडने बेदम मारहाण करणार्‍या दोघांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत प्रसाद शिवगण ( ३२, रा मिरजोळे) यांनी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रसाद १६ फेब्रुवारी रोजी रात्री १०.१५ वाजता डी.एस.भोसले प्लाझा जवळ उभे असताना तिथे आलेल्या दोघा व्यक्तींनी त्यांच्याशी हुज्जत घातली. हुज्जत सुरु असतानाच दोघापैकी एकाने त्याच्याकडे असलेल्या लोखंडी राॅडने प्रसाद शिवगण याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रसाद यांनी त्यांना प्रतिकार केला, परंतु एकाने पकडले व एकाने लोखंडी राॅडने मारले. या झटापटीत प्रसाद याच्या उजव्या हाताला लागले. यानंतर प्रसाद याला नागरिकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

यासंदर्भात प्रसाद शिवगण यांनी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी भारतीय दंड विधान कायदा कलम ३२५, ५०६,५०४,३४ नुसार दोघा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी दुपारी शहर पोलिसांनी डी.एस.भोसले प्लाझा समोर जाऊन पंचनामा केला. दोघा संशयितांचा शोधण्यासाठी एका पथकाची नियुक्ती केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण करीत आहेत.
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा