भाजपचे आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने फेटाळला त्यानंतर नितेश राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, आता
मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणे यांना सर्वप्रथम सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा नितेश राणे यांच्यासाठी एक मोठा
झटका असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी आता नितेश राणे अधिकच अडचणीत येताना दिसत आहेत. सिंधुदुर्ग
सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला. 111 पानांचा
जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा