दुसऱ्या वनडेतील या विजयासह रोहित शर्मा आणि कंपनीने पाकिस्तानच्या विश्व विक्रमाशी बरोबरी केली आहे. भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर सलग ११व्या द्विपक्षीय मालिकेत विजय मिळवला आहे. यातील ७ मालिका घरच्या मैदानावर तर ४ मालिका वेस्ट इंडिजमध्ये जिंकल्या आहेत. भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा पराभव २००६च्या मालिकेत स्विकारावा लागला होता. तेव्हा वेस्ट इंडिजने पाच सामन्यांची मालिका ४-१ने जिंकली होती. तेव्हा भारताचा कर्णधार राहुल द्रविड आणि वेस्ट इंडिजचा कर्णधार ब्रायन लारा होता.
पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्ध सलग ११ द्विपक्षीय वनडे मालिका जिंकल्या आहेत. पाकिस्तानने गेल्या वर्षी झिम्बाब्वेविरुद्ध अखेरची मालिका जिंकली होती. कोणत्याही संघाविरुद्ध सलग सर्वाधिक द्विपक्षीय मालिका जिंकण्याबाबत भारत, द.आफ्रिका आणि पाकिस्तान हे संघ दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पाकिस्तानने वेस्ट इंडज, भारताने श्रीलंका आणि द.आफ्रिकेने झिम्बाब्वेचा पराभव केलाय.
वेस्ट इंडिजचा संघ एकेकाळी जगातील सर्वात मजबूत संघ होता. पण गेल्या दोन दशकात त्यांची कामगिरी घसरत चालली आहे. २००६ सालानंतर वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध फक्त एकदा द्विपक्षीय मालिकेत २ सामने जिंकले आहेत. सध्या सुरू असलेल्या मालिकेत देखील त्यांनी भारताला चांगली टक्कर दिली नाही. आता तिसऱ्या लढतीत ते प्रतिष्ठा वाचवण्यासाठी मैदानात उतरतील.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा