दहावी-बारावीच्या exam ऑफलाईनच आणि नियोजित वेळेत;
मुंबई :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परिक ऑफलाईन घेतल्या जाणार आहेत. मंडळाकडून शनिवारी, सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला आज सरकारने संमती दिली असून त्यात कोणताही बदल करण्यात येऊ नये, अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या नियोजनात ऐनवेळी बदल केल्यास सर्व गणिते बिघडणार असल्याने या परीक्षा मंडळाकडून जाहीर केलेल्या नियोजित वेळेतच घेतल्या जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील शिक्षण विभागाच्या अधिकारी सूत्रांकडून देण्यात आली.
दहावी-बारावीच्या परीक्षा (ssc and hsc written exam) संदर्भात गुरुवारी सकाळी 11 वाजता मंडळाकडून पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर केली जाणार त्यात परीक्षेच्या ऑफलाईन घेण्याचे जाहीर केले जाणार असून नियोजनात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले जाईल असे सांगण्यात आले. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मागील आठवड्यात दहावी बारावीची लेखी परीक्षा आणि त्याचे नियोजन एप्रिलमध्ये करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. राज्यातील शाळा उशिरा सुरू झाल्याने अनेक शाळांमधील अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही, तसेच ऑनलाईन शिक्षणही अनेक विद्यार्थ्यांना मिळाले नाही, असा दावा करत कडू यांनी या परीक्षेच्या नियोजन काही बदल करावेत अशा सूचना मांडल्या गेल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर मंडळाने शनिवारी राज्य सरकारला एक प्रस्ताव सादर केला होता.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा