Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

साखरपुड्याच्या कार्यक्रमावरून परत येत असताना कारला भीषण अपघात

रत्नागिरी: देवरूख-रत्नागिरी मार्गावर संगमेश्वर येथील पांगरी कड्याचा पऱ्या येथे स्विफ्ट कार उलटून झालेल्या अपघातात एका वृध्द व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. येथील कड्याचा पऱ्या परिसरात मंगळवारी दिनांक १५ फेब्रुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट डिझायर पालटल्याने हा अपघात घडला. यामध्ये फणसोप येथील एकजण ठार तर अन्य चारजण जखमी झाले आहेत.

साखरपुड्याचा कार्यक्रम आवरुन स्विफ्ट डिझायर कारने (MH 12/FY- 5844 ) पाचजण फणसोप येथे परत येत होते. प्रवासादरम्यान पांगरी कड्याचा पऱ्या येथे कार आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या चरात जाऊन उलटल्याने हा दुर्देवी अपघात झाला.

याबाबत देवरूख पोलिस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गोपीनाथ गोपाळ कुंभार (वय ६४, रा. फणसोप, ता. रत्नागिरी) असे अपघातात मृत पावलेल्या वृध्दाचे आहे. गोपीनाथ कुंभार यांचा पुतण्या कुणाल किरण कुंभार याचा देवरूख नजीकच्या पाटगाव येथे मंगळवारी साखरपुडा होता. या अपघातात गोपीनाथ कुंभार यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. तर कारमधील कुणाल किरण कुंभार, रूपेश रमेश पावसकर, किरण भास्कर कुंभार, कविता गोपीनाथ कुंभार हे चारजण जखमी झाले. त्यांच्यावर रत्नागिरीत उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.

दरम्यान, अपघाताची खबर कुणाल कुंभार याने देवरूख पोलिस ठाण्यात दिली. अपघाताचे वृत्त कळताच तात्काळ पोलिस उपनिरीक्षक पाटील, पोलिस नाईक जावेद तडवी, पोलिस नाईक संदेश जाधव, पोलिस नाईक किशोर जोयशी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. देवरूख पोलिस स्थानकात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा